पिंपरी दि. १० ऑगस्ट :- तुमचे बेकायदेशीर पासपोर्ट लॅपटॉप, ८०० ग्रॅम गांजा व १४० ग्रॅम एमडीएमए असे कुरिअर पार्सल आल्याचे आरोपीने फिर्यादीला सांगितले. ते कुरिअर कस्टम यांनी पकडले आहे, अशी खोटी माहीती देवून त्यातून बाहेर काढण्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन करुन फिर्यादीकडुन एकून ३६,९९,९९९ रुपये मागितले.
व्हेरीफिकेशन नंतर लगेच परत पैसे ट्रान्सफर होतील, असे सांगून फिर्यादीकडून पैसे खाते क्र ०१९०००२१०००४२५९७ व आयफसी कोड पीयुएनबी ००१९००० मध्ये ट्रान्सफर करुन घेतले. परंतू त्यानंतर त्यांनी ते परत न करता फिर्यादी यांची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ८) रोजी सकाळी ०९.१५ ते दुपारी १.०० च्या दरम्यान बाणेरमध्ये घडला. महिला फिर्यादीने आरोपी मोबाईल नं. ८८८१७३१५०३ व स्काईप आयडी live.cid.b07cd225843044c1 चा वापरकर्ता अनोळखी इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ९४५ / २०२३.भा.द.वि.कलम ४२०, ४०६ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि साळुंके पुढील तपास करीत आहेत.
/newsdrum-in/media/media_files/eTQ7xyYDqqzuCym4zw3X.jpg)


