/newsdrum-in/media/media_files/eTQ7xyYDqqzuCym4zw3X.jpg)
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे कोर्टाने त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन दिला. परंतु नवाब मलिक हे राजकारणातून निवृत्ती घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसे संकेतच त्यांचे भाऊ कप्तान मलिक यांनी आज दिले.
नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने जल्लोष केला. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनीही आनंदोत्सव साजरा केला. राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांनी मलिकांच्या जामीनावर समाधान व्यक्त केलेलं आहे.
दीड वर्षांच्या तुरुंगवासानंतर ज्येष्ठ नेते नवाब मलिक हे बाहेर पडत आहेत. त्यामुळे ते नेमके कोणत्या गटाचे? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यापूर्वीच त्यांच्या भावाने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्यावरुन नवाब मलिक राजकारणातून एक्झिट घेणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.


