सांगवी : सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून आरोपीने महिलेचा न्यूड व्हिडिओ काढला होता. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी पैशांची मागणी करत महिलेची 30,000 रुपयांची फसवणूक केली आहे.
हा प्रकार 6 जुलै रोजी ऑनलाईन पद्धतीने झाला. या प्रकरणी पीडित महिलेने गुरुवारी (दि. 10) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार सांगवी पोलिसांनी या इंस्टाग्राम अकाउंट धारक व मोबाईल धारकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व पीडित महिला यांच्यातील इंस्टाग्राम वरून ओळख झाली. त्यांनी स्वतःचे मोबाईल नंबर शेअर करत ओळख वाढवली. पिडीतेचा विश्वास संपादन (Sangavi) करून फिर्यादीला व्हिडिओ कॉल करत त्यांचा न्यूड व्हिडिओ काढला.



