पिंपळे सौदागर येथील आर.जे. स्पा येथे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकला. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली.
याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलाही दोन महिलांना पैशाचे आमिष देऊन स्पा व मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करून घेत होत्या. पोलिसांना याची खबर मिळताच पोलिसांनी छापा टाकत आरोपी महिलेला अटक केली आहे. तर दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. वाकड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.




