पिंपरी दि. १० ऑगस्ट :- पार्क केलेल्या रिक्षाला फिर्यादीच्या मालकीच्या अॅटो रिक्षाचा नंबर असल्याचे फिर्यादीच्या निर्दशनास आले. फिर्यादी यांनी पोलीसांची मदत घेवुन सदरची रिक्षा वाकड पोलीस ठाण्यात आणली.
गैरउद्देशाने आरोपीने रिक्षास फिर्यादीच्या रिक्षाची नंबर प्लेट लावुन ती वापरुन फिर्यादीची व शासनाची फसवणुक केली आहे. ही घटना (दि. ९) रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास बेबीज इंग्लीश मिडीयम स्कुलजवळ, तापकीर नगर, काळेवाडी यथे घडली.
फिर्यादी सुशिल किसनराव भंडलकर यांनी आरोपी किरण पवाळ याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकाच्या विरोधात ७७६/२०२३ भा.द.वि. कलम ४२० प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मणेर पुढील तपास करीत आहेत.




