पिंपरी दि. १२ ऑगस्ट :- ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ वर्षपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रम देशात सर्वत्र मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमातंर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत शहरातील सर्व नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत घरावर तिरंगा ध्वज फडकवावा असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी शहरवासीयांना केले आहे.
या उपक्रमासाठी नागरिकांसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये नाममात्र शुल्कामध्ये ध्वज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.




