- “ये आसमान का इशारा है… कल का सुरज तुम्हारा है” चिंचवड विधानसभेत नाना काटे यांचा वादळ….
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, चिंचवडगाव, वाकड, थेरगाव, रावेत, किवळे, वाल्हेकरवाडी अशा सर्वच प्रमुख ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी नाना काटे यांचे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावून “ये आसमान का इशारा है… कल का सुरज तुम्हारा है” असे म्हणत चिंचवड विधानसभेत पुन्हा नाना यांच वादळ राहणार असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकिटावर नाना काटे यांनी जवळपास एक लाख मतदान घेवून निवडणूक लक्षवेधी केली होती. भाजपच्या विद्यमान आमदाराच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली होती भाजपकडून त्यांच्याच पत्नीला उमेदवारी देण्यात आली होती. केवळ भावनिक लाटेमुळे आणि बंडखोरीमुळे 18 हजाराच्या फरकाने नाना काटे यांना विजय विजयापासून दूर रहावे लागले होते. पण पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने नाना काटे तयारीला लागले असल्याचे चित्र त्यांच्या वाढदिवसानिमित्त होत असलेल्या ब्रॅण्डिंगवरून दिसत आहे.
नाना काटे यांचा 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त चिंचवड विधानसभा मतदार संघातील जुनी सांगवी, पिंपळे गुरव, रहाटणी, काळेवाडी, वाल्हेकरवाडी आदी परिसरात नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दातांचे उपचार, हृदयरोग तपासणी, कॅन्सर शस्त्रक्रिया उपचार व तपासणी, जनरल शस्त्रक्रिया, मणक्याचे विकार शस्त्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. काही पदाधिकाऱ्यांनी 15000 वृक्ष लागवड तसेच सफाई कर्मचाऱ्यांचे सत्कार असे विविध उपक्रम घेत आपल्या नेत्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करताना दिसत आहेत. चिंचवड मतदार संघातील प्रत्येक कानाकोपऱ्यात नाना काटे यांना शुभेच्छा देणाऱ्या फ्लेक्समुळे “आपकी बार नाना की हुंकार” नागरिक देताना दिसत आहेत.




