एका अल्पवयीन मुलाला भेटण्यासाठी बोलावून त्याला कोयत्याने मारहाण केली आहे. याप्रकरणी देहुरोड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.12) देहुरोड येथे घडली.
याप्रकरणी अल्पवयीन मुलाने रविवारी (दि.13) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अरमान निजाम पटेल (वय 21 रा.देहुरोड) याला अटक केली असून आणखी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगा हा दुध पिशवी घेऊन घरी जात असताना आरोपी तेथे आले व त्यांनी फिर्यादीला पाण्याच्या टाकीजवळ भेटायला बोलावले. यावेळी फिर्यादीला त्यांनी कोयत्याने उलट्या बाजूने हातावर मारत जखमी केले. यावरून देहुरोड पोलिसांनी एकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.




