पिंपरी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत पत्रकारांनीदेखील नेत्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत असे म्हटले. दरम्यान, राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी राजपुत्र ‘अमित ठाकरे’ हे बाल्कनीत बसून राज ठाकरे यांचे भाषण ऐकत होते. त्यामुळे अमित ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांकडून कौतुक होताना बघायला मिळाले.
पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित होते. वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेधदेखील राज ठाकरे यांनी केला. दरम्यान, राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेदेखील या कार्यक्रमास उपस्थित होते.




