नवी दिल्ली : या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या छत्तीसगढ विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपली पहिली उमेदवार यादी जारी केली. त्यातील एका महत्त्वाच्या जागेवर बधेत विरुद्ध बघेल अशी लढत होण्याची शक्यता आहे. पक्षाने दुर्ग मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार विजयकुमार बघेल यांना आता आमदाराकीसाठी तिकिट दिले असून ते पाटन येथून आपले काका आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. तसेच मुख्यमंत्री बघेल यांनी ते आपल्या बालेकिल्ल्यातूनच रिंगणात अतील की अन्य मतदारसंघाची निवड करतील हे अद्याप जाहीर केलेले नाही. तथापि, भाजपने मात्र त्यांच्या पुतण्याला लोकसभेतून पुन्हा विधानसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांची आपल्याच मतदार संघात कोंडी करण्याची भाजपची योजना असल्याचे सध्या तरी म्हटले जाऊ शकते.




