पिंपळे सौदागर: आठवडे बाजारमुळे नागरिकांना ट्रॅफिक अडचण लक्षात घेत “नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे” आज रविवार दि.२०/०८/२०२३ रोजी गोविंद-यशोदा चौक रोडवरील आठवडा बाजार हा लिनियर गार्डन लगतच्या सर्विस रोडवर स्थलांतरित करण्यात आलेला आहे. जे कोणी विक्रेता फुटपाथवर लावणार आहे त्यावर अतिक्रमणद्वारे कार्यवाही केली जाईल. त्यामुळे गोविंद चौक ते काटे पेट्रोल पंप हा रस्तावर ट्रॅफिक राहणार नाही. नागरिकांनी आपली वाहने पार्किंगला लावून सहकार्य करावे व आठवडे बाजाराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पिंपळे सौदागर मध्ये सर्वात प्रथम लोकांना थेट शेती माल आणि भाज्या मिळाव्यात ह्या उद्देशाने नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आठवडी बाजाराची सुरुवात केली. त्यानंतर ह्याच परिसरात असंख्य आठवडी बाजार सुरू झाले. सध्या पिंपळे सौदागरमध्ये ट्राफिक चा प्रश्न सर्वच ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे शत्रुघ्न काटे यांनी स्वतःहून सुरू केलेल्या आठवडी बाजार मुख्य रस्त्यापासून बाजूला घेऊन गोविंद यशदा चौकातील ट्राफिक चा प्रश्न सोडविला आहे. ह्यामुळे नक्कीच सामान्य नागरिकांना येथील प्रवास सोईस्कर होणार आहे.




