पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) सहकारी बँकांच्या थकीत कर्जाची वसुली करण्याकरीता संदर्भातील सरकारी जाचक अटी शिथील होणे गरजेचे आहे. वसुलीची अनियमितता होऊ नये, याकडे अधिक देने गये आहे, असे मत जयहिंद बँकेचे संस्थापक अध्यक्ष धनाजीराव विनोदे यांनी व्यक्त केले.
जयहिंद बँकेची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली त्यावेळी विनोदे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अनंत कोराळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष सुधीर वाल्हेकर, अँड अतिश लांडगे, राहुल भोईर, पंडित अल्हाट, गुलाव वाघोले, देविदास लोंढे, अजिंक्य विनोदे, अरुण भुमकर, परिक्षीत सोपनार, शांताराम भोंडवे, सुषमा विनोदे, पल्लवी पांढरे, दिलीप दाणी आदी संचालक उपस्थित होते.




