पिंपरी :- गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याकरीता आरोपी दोघा महिलांनी त्यांच्याजवळ अनाधिकाराने बिगर परवाना बेकायदेशिररित्या माल खोलीत ठेवला.
एका महिलेकडून मळकट निळसर रंगाचे अंदाजे २०० लिटरचे ०२ ड्रम त्यामध्ये एकुण अंदाजे २५० लिटर गावठी दारू तयार करण्याचे (कच्चा माल मिश्रण) रसायन व सह आरोपी २ हिच्याकडून एकूण २५,५०० रू. किं.चा माल, त्यामध्ये मळकट निळसर रंगाचे अंदाजे २५० लिटरचा ०१ ड्रम त्यामध्ये एकुण अंदाजे २०० लिटर गावठी दारू तयार करण्याचे (कच्चा माल मिश्रण) रसायन (दि. २१) रोजी १.०५ ते ०१.५० च्या सुमारास बि.नं. ४, रूम नं. १३ व १४ मध्ये, भाटनगर, पिंपरी येथील खोलीमध्ये पोलीस कारवाईत जप्त करण्यात आला आहे.
पिंपरी पोलिसांनी ८६९ / २०२३, मुंबई प्रोहिबिशन अॅक्ट कलम ६५ (ई) प्रमाणे ४७ आणि ५५ वर्षीय दोन महिला आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोना डगळे पुढील तपास करीत आहेत.



