![]()
पुणेः उद्योगपती डी.एस. कुलकर्णी यांना जामीन मंजूर झाला आहे. तब्बल पाच वर्षांनंतर कुलकर्णी तुरुंगाबाहेर आलेले आहेत. माध्यमांच्या हाती कुलकर्णी यांचे काही फोटो लागले आहेत.
फेब्रुवारी २०१८मध्ये डीएसके, त्यांच्या पत्नी, मुलगा, मेव्हणे, जावई आणि कंपनीतीली लोकांना अटक करण्यात आलेली होती. ज्या कायद्यांतर्गत कारवाई झाली त्या कायद्यान्वये किती काळ तुरुंगात ठेवता, येतं हे कोर्टाने पाहिलं.
पाच वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर डीएस कुलकर्णी यांना जामीन मिळाला आहे. डीएसकेंच्या १३५ मालमत्ता आहेत. गृह प्रकल्प, मोकळ्या जागा, ड्रीम सीटी ३०० एकराचा प्रकल्प असेल यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र गुंतवणूकदारांचा एक रुपयाही परत मिळालेला नाही.




