पिंपळे सौदागर : पी. के . इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त पी. के. इंटरनॅशनल स्कूल अँड जुनिअर कॉलेजचे संस्थापक जगन्नाथ काटे आणि प्राचार्या धनश्री सोनावणे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
यावेळी बोलताना जगन्नाथ काटे म्हणाले की, दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. प्रत्येकाचा पहिलं गुरु आईच असते. त्याच्याही पलीकडचे ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षक रुपी मार्गदर्शकाची भूमिका महत्त्वाची असते. विद्यार्थांना घडवत असताना त्याच्यावर चांगले संस्कार लादणे, चांगले चरित्र घडवणे, त्याच्या मनात थोर व्यक्तींच्या बद्दल आदर, निर्माण करणे. एक आदर्श आणि आज्ञाधारक विद्यार्थी घडवणे हे शिक्षकाचे काम आहे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व निर्माण करून एक आदर्श नागरिक बनविणे याचे सर्व श्रेय शिक्षकांनाच जातं असे त्यांनी म्हटले आहे.
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकां बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. “गुरुविण आयुष्य निरर्थक आहे ! गुरूशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. यावेळी संस्थेच्या वतीने सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . नम्रता पटेल , केतकी मामर्डे व सुरेखा आरोटे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.



