बीजिंग : भारताकडे यजमानपद असलेल्या ‘जी-२०’ परिषदेस चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित राहणार नसल्याचे सोमवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यानंतर या परिषदेस अनुपस्थित राहणारे ते दुसरे राष्ट्रप्रमुख ठरले आहेत.
सीमेवरील तणाव, चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेश व अक्साई चीनचा समावेश अशा मुद्द्यांमुळे भारतासोबत परराष्ट्र धोरणविषयक वादाचे मुद्दे निर्माण झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जिनपिंग यांनी भारतभेट टाळल्याचे म्हटले जाते. त्यांच्याऐवजी चीनचे पंतप्रधान ली किआंग या परिषदेत देशाचे प्रतिनिधित्व करतील, अशी माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सोमवारी जाहीर केले. ‘जी-२०’ परिषदेसोबतच जिनपिंग यांनी आसियान परिषदेत उपस्थित राहण्यासही असमर्थता दर्शवली आहे. ही परिषद इंडोनेशियामध्ये होणार असून, तेथेही पंतप्रधान ली किआंग उपस्थित राहणार आहेत.




