पिंपरी : बोल बजरंग बली की जय… गोविंदा आला रे आला… मचगया शोर सारी नगरी रे… अशा गाण्यांवर मोहननगर चिंचवड येथील भगव्या दहीहंडी महोत्सवात तरुणाई थिरकली, तर सिनेक्षेत्रातील प्रसिध्द कलावंतांनी मनोरंजनाद्वारे उपस्थितांची मने जिंकली. अन् रचलेले थरावरील थर चढत दहीहंडी फोडून, गोविंदा पथकांनी शहरामधून लाखोंची बक्षिसे जिंकली. हा सर्व उत्सव सोहळा पाहण्यासाठी परिसरातील तरुण, महिला, अबालवृध्दांनी गाय वासरू चौकात एकच गर्दी केली होती. या वेळी जनसमुदायांमधून गोविंदा आला रेच्या घोषणांनी आजूबाजूचा परिसर दुमदुमून गेला.
गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने रिमझिम सुरुवात केल्यामुळे दहीहंडी महोत्सवाला आणखी उधाण चढले होते. शिवसेना शाखा मोहननगर सर्व शिवसैनिक आणि नगरसेविका मीनल विशाल यादव यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाच्या आयोजन केले होते. शहरातील अनोख्या भगव्या दहीहंडी उत्सवाला तरुणाईची गर्दी बसवली होती गाण्याच्या दंतणात व पावसाच्या हलका शुल्कावामुळे उत्साही वातावरणात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सहा थर लावून मरीआई गोविंदा पथक चेंबूर गोविंदा पथकाने रात्री नऊ वाजता दहीहंडी फोडली.




