भोसरी : शाम विटकर हा बोलला की, तुला येथे धंदा करावयाचा असेल तर आम्हाला रोजचे २०० रुपये हप्ता दे, नाहीतर तुझे दुकान तोडून टाकील. अशी धमकी आजुबाजच्या दोन फळविक्रीत्याना देवून त्यांना कोयत्याचा धाक दाखवुन खंडणी घेतली व परीसरात दहशत माजवुन नागरीकांना त्रास दिला. म्हणून कोयता गँगचे मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दिघी पोलीस ठाणे येथे गु. रजि नं. २७८/२०२३ भा. द. वि. कलम ३८४ ३८५, ५०६, ३४ भारतीय हत्यार अधिनियम कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) ( ३ ) सह १३५ या गुन्हयात फिर्यादी सोहम पदमाकर काळे, वय २३ वर्षे धंदा फळ व्यवसाय हे दिनांक १९/०६/ २०२३ रोजी सायंकाळी १७/३० वा. च्या सुमारास योगीराज चौक येथे त्यांचे दुकानावर फळविक्री करत असताना इसम नामे शाम विटकर, ज्ञानेश्वर बडगे, राकेश काळे, अजय देवरस है मोटार सायकलवर फिर्यादीचे दुकानावर येवून अजय देवरस यांने कोयता दाखवून आम्ही कोयता गँगची माणसे आहोत आळंदीचा बाप ज्ञानेश्वर बडगे आहे. शाम विटकर हा बोलला की, तुला येथे धंदा करावयाचा असेल तर आम्हाला रोजचे २०० रुपये हप्ता दे, नाहीतर तुझे दुकान तोडून टाकील, अशी धमकी व फिर्यादी आजुबाजच्या दोन फळविक्रीत्याकडुन कोयत्याचा धाक दाखवुन खंडणी घेतली व परीसरात दहशत माजवुन नागरीकांना आस दिल म्हणून वर नमुद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच कोयता गँग आळंदी तसेच दिघी पोलीस ठाणे हद्दीत हातात कोयता घेवुन नागरीकांच्या मनात दहशत निर्माण करत असल्याने सदर गुन्हयांचा सखोल तपास करणे बाबत मा. पोलीस आयुक्त सो पिंपरी चिंचवड यांनी आदेशीत केले होते.
सदरचा तपास चालू असताना पाहिजे आरोपी १) शाम रवि विटकर वय २२ वर्षे २) अजय किसन देवरस, वय २३ वर्षे, ३) ज्ञानेश्वर सिध्दार्थ बडगे वय ३० वर्षे च ४) राकेश सुरेश काळे वय २३ वर्षे यांनी खुनाचा प्रयत्न करणे, जबरी दुखापत करणे, दरोडा टाकणे, विनयभंग करणे, मारामारी करणे, जबरी दुखापत करणे, खंडणी मागणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांनी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये वेगवेगळे साथीदार वापरून गुन्हे केले असुन आरोपी यांचेविरोधात पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे शहर आयुक्तालयात हद्दीमध्ये एकुण ०८ गुन्हे दाखल आहेत. आरोपी वारंवार वेगवेगळे साथिदार वापरून संघटीतपणे टोळीने गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने अटक आरोपी व पाहिजे आरोपी यांचेविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदरच्या कारवाईत खालील ०२ आरोपींना अटक करण्यात आले आहे.
१) ज्ञानेश्वर सिध्दार्थ बडगे वय ३० वर्षे रा. साठेनगर पदमावती रोड, आळंदी ता.खेड जि.पुणे २) राकेश सुरेश काळे वय २३ वर्षे रा. भगवान गडाचे शेजारी आण्णाभाऊसाठे नगर आंळदी देवाची ता. खेड जि पुणे
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त सो पिंपरी चिंचवड श्री. विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त सो. डॉ. संजय शिंदे, मा. अप्पर पोलीस आयुक्त सो, श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उपायुक्त सो परीमंडळ ०३. श्री. संदिप डोईफोडे मा. सहायक पोलीस आयुक्त सो, चाकण विभाग, श्री. राजेंद्रसिंह गौर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, दिघी पोलीस ठाणे मच्छिंद्र पंडीत, दशरथ वाघमोडे पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस ठाण्याचे तपास पथकातील सुनिल भदाणे, पोलीस उपनिरीक्षक दत्ताञय ननावरे पोलीस उप निरीक्षक, पोहा ७१३ चिंतामण फलके, पोहा ८०१ प्रदीप पोटे, पोहा ९५३ शरद विचु पोहा १०२० किशोर कांबळे, पोहा ११६८ सतीष जाधव, पोहा १४०६ शशिकांत पवार, पोना १५७२ किरण जाधव, पोशि २०१४ बाबाजी जाधव, पोशि २८२८ वैभव काकडे, पोशि ३५५३ कसबे व पोशि ३३९१ भोसले यांनी केली.




