पिंपरी (प्रतिनिधी) यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना विनाविलंब तात्पुरत्या नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी तात्पुरती अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
मंडपात शॉर्टसर्कीट होणे, विद्युत वायरिंगमध्ये विघाड होणे आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तसेच तातडीच्या मदतीची गरज भासल्यास उत्सवातील दहा दिवसांसाठी ७८७५७६७१२३ हा विशेष संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच नेहमीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.
…तर कारवाई
गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.




