हिंजवडी (वार्ताहर)- हिंजवडीला आयटी पार्कची उभारणी करण्यात पवार साहेबांचे योगदान मोठे आहे. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून केवळ आयटीचा विस्तार करण्याचा त्यांचा संकल्प होता. परंतु नंतरच्या काळात सरकारमध्ये असलेल्या राज्यकत्यांकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याने या भागाची डेव्हलपमेंट नियोजनबद्ध झाली नाही. याकरिता अतिशय वेगाने वाढणाऱ्या हिंजवडी, माण परिसराचे नागरीकरण सरकारने तातडीने थांबवावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
हिंजवडी मान मारुंजी परिसरात अनेक आयटी कर्मचारी यांचे वास्तव्य वाढल्यामुळे आणि आनंद रस्त्यामुळे दैनंदिन वाहतूक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तसेच रस्ते वीज व पाणी कचरा या मूलभूत समस्यांचे प्रमाण हे वाढत आहे. निसर्गाने नटलेल्या परिसरात स्वप्न उराशी वाळवून रहिवाशी म्हणून आलेल्या अनेक नागरिकांच्या आशेवर पाणी फिरत आहे. त्यांना बिल्डर कडून या सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. यासाठी शासन सक्षम नसेल तर ही गावे महापालिकेत तातडीने समाविष्ट करून घ्यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.




