पिंपरी (प्रतिनिधी) गणेशोत्सवानिमित्त खासगी बसेसने प्रवास करणान्यांकडून जादा दराची आकारणी केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. प्रवाशांनी या बाबतची तक्रार करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. त्याची त्वरीत दखल घेऊन कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
गणेशोत्सवानिमित्त शहरातून गावी जाणान्या प्रवाशांकरिता खासगी बस संचालकांनी अवाजवी भाडे आकारणी केल्यास त्याबाबतच्या तक्रारी किंवा पुरावे देण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. परिवहन विभागाच्या dyrto. [email protected] ई मेल आयडी वर किंवा या कार्यालयाच्या ईमेल आयडीवर देण्याचे आवाहन केले आहे. खासगी बसेसची सेवा पुरविणारे वाहतूकदार संबंधित मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे आकारण्यात येणाऱ्या भाड्याच्या कमाल दीड पटपर्यंत भाडे आकारू शकतात. प्रवाशांकडून निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारल्याचे किंवा घेत असल्या आढळून आल्यास कारवाई करण्याचे आदेश मोटार वाहन निरीक्षक यांना देण्यांत आलेले आहेत. अशी माहिती पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली आहे.




