पिंपळे सौदागर, २० सप्टेंबर :- सालाबादप्रमाणे यंदाही उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘ उन्नति चा गणपती महोत्सवाला गणेश भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला. ‘ऐच्छिक दान – मूर्ती आमची किंमत तुमची’ या स्वरूपात घरोघरी आणि गणेश मंडळांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती वितरित करण्यात आली. परिसरातील जवळपास एक हजार गणेशभक्तांनी या उपक्रमास प्रतिसाद देत घरोघरी शाडू मातीच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. दरम्यान राजेश एम पवार यांचा कलात्मक छायाचित्र प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले होते.
‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कुंदाताई भिसे म्हणाल्या, पिंपरी चिंचवड शहरात गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी उन्नति सोशल फाउंडेशन पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासूनच गणेशमूर्ती तयार करण्यासाठी अनेक वर्षांपासून पुढाकार घेत आहे. उन्नतीचा गणपती महोत्सव’ या उपक्रमातुन ” ऐच्छिक दान ” स्वरूपात गणेश मुर्त्यांचे गणेशभक्तांना वितरण केले जाते. नागरिकांच्या आवडीनुसार महिनाभर गणेश मूर्तीचे बुकिंग घेतले जाते. यात परिसरातील मोठ्या गणेश मंडळांचा देखील समावेश असतो. या अभिनव उपक्रमाला परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत असून पर्यावरण रक्षणासाठी यापुढेही ही मोहीम अशीच सुरु ठेवणार आहे.
त्यावेळी ह भ प शेखर महाराज जांभुळकर, ह भ प धारू बालवडकर,पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशन चे प्रमुख कार्यवाह व आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच दत्ता झिंजूर्डे,पि के स्कुल चे संस्थापक जग्गनाथ काटे,समाजसेवक अशोक पारखी ,रोहिदास गवारी,राजेंद्रनाथ जसवाल, विठाई वाचनालय सर्व सभासद, आनंद हास्य क्लब चे सर्व सभासद, ऑल सिनियर सिटीजन असोसिएशन चे सर्व सभासद व परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते. व आभार श्रीकृष्ण निलेगावकर यांनी मानले.




