पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश मंडळांना आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. आगामी लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटींना महत्व दिले जात आहे. अजित पवार यांनी शहरातील सुमारे ४० पेक्षा अधिक गणेश मंडळांना भेटी देण्याचे आयोजन आहे.

यावेळीउपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी मोरया गोसावी समाधी मंदिराला भेट देऊन तेथील आवारात कार्यकर्ते व शहर कार्यकारणी समवेत श्री ची आरती केली. व पिंपरी चिंचवड शहरातील विविध मंडळाना भेट देऊन तेथील कार्यकर्ते मंडळाना भेट देऊन दौरा पूर्ण केला.

पिंपरी चिंचवड शहरात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या 670 झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली. प्रकल्पाची माहिती घेत शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारे काम अधिकाऱ्यांनी करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांच्या नवीन पेट्रोल पंपाचे उद्घाटन केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या व नेत्यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी व नागरिकांशी संवाद साधला. या मंडळांमध्ये आपल्या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गणेश मंडळांना भेटी देतानाच अन्य पक्षाच्या अथवा विचारधारेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गणेश मंडळांनाही भेटी दिल्या.
काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपरी गांव, चिंचवड गांव, थेरगांव, पिंपळे गुरव, दापोडी, भोसरी गावठाण, चऱ्होली, मोशी, रावेत, निगडी, तळवडे, चिखली गावठाण, साने चौक असा संपुर्ण शहराचा दौरा करत गणेश मंडळांना भेट देत आहेत. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि नाना काटे हे सोबत राहिले.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0nMLFwd7fnb7Xnd31G8sh3MLVuQosshXsw7L2NhjYgqd6xgGaTH22NKyxePDfN8GTl&id=100068943727752&mibextid=eTTSPi
साने चौकात दत्ताकाका साने यांचे पुत्र यश साने व दत्ता काका साने फाउंडेशनच्या वतीने जेसीपी मधून पुष्पवृष्टी करत अजित पवार यांची जोरदार स्वागत करण्यात आले.



