पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराला मागील तीन दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडत असताना दुसरीकडे मात्र चक्क उड्डाणपलावरतीच पाण्याचे तळे साचल्याचा प्रकार चिखली पोलीस ठाण्यासमोर असणाऱ्या उड्डाणपलावरती दिसून आला.
पिंपरी चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश भागांत पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी साचून राहत असल्याचे दिसून येत आहे. पिंपरी कोर्ट ते चिखली कुदळवाडी मार्गावरील स्पाइन रोडवरील पवार वस्ती येथील उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा न झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले होते. त्यामुळे वाहनचालकांना मार्ग काढताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन शहरातील ज्या भागांत पाणी साचत आहे तेथे तात्पुरती उपाययोजना करत आहे. परंतु स्पाइन रोडवरील पवार वस्ती येथील उड्डाणपुलावरील पावसाच्या साठा होताना दिसत आहे. परंतु महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाण्याचा निचरा न झाल्याने गोल सर्कलला पूर्ण पाण्याचा वेढा घातला आहे. येथील पाण्याचा साठ्यामुळे अक्षरशः गुडाभर पाण्यातून वाहनचालकांना मार्ग काढावा येथे व्यवस्था करावी, तरी महापालिकेच्या संबंधित विभागाने त्वरित कारवाई करत नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.





