मुंबईः पुढील बारा तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये कमी वेळेत जास्त पाऊस कोसळू शकतो. त्यामुळे घाट रस्त्याने प्रवास टाळावा, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.
हवामनविषयक अभ्यास करणाऱ्या सतर्क संस्थेने पावसाचे अपडेट्स दिलेले आहेत. रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी साडेचार वाजल्यापासून पुढे १२ तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, पुणे- घाट क्षेत्रामध्ये काही ठिकाणी कमी वेळात जास्त पावसाची शक्यता आहे. यामध्ये झाडं उन्मळून पडणे, दरड कोसळणे, डोंगरावरुन माती वाहून येणे अशा घटना घडू शकतात.



