- अभिषेक इंटरनॅशनल शाळेमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
मोशी : शाळेच्या आवारात दररोज तिन्ही भाषेमध्ये प्रार्थना घेतली जाते. प्रत्येक गुरुवारी मनस्वस्थ्यासाठी खास ध्यान साधना होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक आठवड्यामध्ये शारिरीक शिक्षण, झुंबा, कराटे, संगीत, चित्रकला, मूल्यवर्धन शिक्षण या खास तासिकेचे नियोजन केले आहे.
स्वातंत्र्य दिनी वीर सैनिकांना अमर जवान ज्योत स्थापना करून श्रद्धांजली देण्यात आली. जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले. ही माहिती समाजामध्येही उत्स्फूर्तपणे पोहचावी यासाठी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून जागोजागी पथनाट्य सादर केले.
यावर्षीचा गणेशोत्सव मध्ये वृक्षरूपी गणेशाची पूजा करून मुलांना वृक्ष जोपासण्याचा संदेश दिला. आपल्या शाळेमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रीजी जयंती निमित्त तंबाखूजन्य नशेले पदार्थ सेवन टाळण्याची व प्रतिबंध करण्याची शपथ घेतली.
आत्ता नुकतेच ४ ऑक्टोंबर – जागतिक प्राणी कल्याण दिनानिमित्त शाकाहारी जेवणाचे महत्व विषद केले तसेंच फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. पालक वर्ग व समाजातील विविध स्तरातून कौतुकाच्या करण्यात आले.




