लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई वाहिनीवर ITMS प्रोजेक्ट अंतर्गत बोरघाट हद्दीत ४५ किमी/६०० किमी आणि ४१ /५०० किमी या ठिकाणी Gantry बसविण्यात येणार आहे. Gantry बसविताना सदर कालावधीत वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. फक्त कारसाठी लोणावळा एक्झीट वरून जुन्या महामार्गावरून अंडा पॉईंट – मॅजिक पॉईंट वरून खोपोली शहरातून वळविण्यात येणार आहेत.
दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी याची नोंद घ्यावी तसेच पर्यायी मार्गाचा वापर करावा. Gantry बसविताना सदर कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक उर्से टोल नाका येथे तसेच शोल्डर लेनवर पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. आजही दुपारी १२ ते २ दरम्यान पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन हलक्या वाहनांसाठी शिंग्रोबा घाटातील वाहतूक सुरू होती.




