पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड महापालिकेचे चिंचवडमध्ये पालिकेचे ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय आहे. या कार्यालयातील सर्वच विभागांमध्ये नागरिकांची विविध कामासाठी गर्दी असते. या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर विवाह नोंदणी विभाग आहे. या विभागात येणाऱ्याची मोठी वर्दळ असते. मात्र, येथे येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागत आहे.
विवाह नोंदणी विभागात एका कुटुंबासोबत किमान पाच ते सहाजण येतात. या विभागात सर्व कागदपत्रे पडताळणी होतात. सहाजिकच या कामास बराच वेळ जातो. मात्र, बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था नसल्याने काम, होईपर्यंत नागरिकांना एक तर ताटकळत उभे रहावे लागते. अनेकदा कामासाठी आलेले नागरिक कंटाळून जमिनीवर बसतात. त्यामुळे महापालिकेने प्रशस्त इमारत बांधूनही बसण्याची पुरेशी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत.
महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी ‘व’ क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित यांना विवाह नोंदणी व अन्य विभागात नागरिकांना बसण्याची व्यवस्था करावी या मागणीचे निवेदन दिले. तर, निवेदनाची दखल घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही केली जाईल, असे अमित पंडित यांनी दिले.




