मुंबई – शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आमदार विवेकानंद यांच्यावर इंडीने मोठी कारवाई केली आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणी त्यांची स्थावर स्वरूपाची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. विवेकानंद पाटील यांच्या १५२ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीकडून कारवाई करण्यात आली. या मालमत्तेमध्ये भूखंड, बंगला तसेच रहिवाशी संकुलाचा समावेश करण्यात आला आहे.
विवेकानंद पाटील हे कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. याच काळात बँकेच्या घोटाळाप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे ११ ईडीकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ईडीकडून त्यांच्या १५२ कोटींच्या मालमत्तेवर तात्पुरती टाच मारण्यात आली.
तसेच या मालमत्तेमध्ये विवेकानंद पाटील यांच्या कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या मालमत्तेचा देखील समावेश करण्यात आला आहे.




