पिंपरी :- महापालिकेने आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे. अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांचा देखील सहभाग असावा या उद्देशाने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांनी देखील आपल्या सूचना पाठवाव्यात, असे आवाहन केले आहे.
सन २०२४- २५ च्या अर्थसंकल्पासाठी नागरिकांना १० नोव्हेंबर २०२३ सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या सूचना संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठविता येणार आहेत.
क्षेत्रीय कार्यालय किंवा प्रभागातील कामे सुचवावीत. नागरिक नागरी सुविधेसंदर्भातील स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, उद्यान, आरोग्य व इतर विभागाची कामे नागरिक सांगू शकतात. तसेच, नावीन्यपूर्ण कल्पनेचे कामही सुचविता येऊ शकतात. योग्य सूचनांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे. नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालय, स्थापत्य, विद्युत आणि पाणीपुरवठा विभागाच्या मेलवर आपल्या नाव व संपर्क क्रमांकास सूचना पाठव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.




