पिंपरी चिंचवड : भारतातील सर्वात मोठा रिटेल ज्वेलरी ब्रँड आणि टाटा समूहाचा एक भाग, वाकड येथील फिनिक्स मॉलमध्ये तनिष्क शोरूमचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तनिष्क समूहाचे जनरल मॅनेजर विजय पोडोरी, धवल मेहता, शोरुमचे संचालक मीनल पवार, राज पवार यांनी संयुक्तपणे रिबन कापून दीपप्रज्वलन केले.
वाकड, हिंजवडी आयटी परिसरात फिनिक्स मॉलमध्ये तनिष्क शोरूम सुरू झाल्याने नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे दागिने खरेदी करता येणार आहेत असे गौरवोद्गार अजित पवार यांनी बोलताना भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे नगरसेवक विक्रांत लांडे, प्रशांत शितोळे,डॉ. रमेश भोईटे, किशोर भापकर आणि पवार परिवार यावेळी उपस्थित होते.
तनिष्क सोन्याचे आणि हिरे आणि सॉलिटेअरने बनवलेल्या तनिष्क ज्वेलरी अंगठ्याचे अनन्य संग्रह विविध गरजेनुसार उपलब्ध करून दिले आहेत. सोन्याच्या पोल्की कुंदन आणि डायमंड वेडिंग ज्वेलरीपासून ते आकर्षक आधुनिक दागिन्यांपर्यंत विविध सुंदर कलेक्शन या शोरूममध्ये ठेवण्यात आले आहेत. देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह दागिना म्हणजे तनिष्क, सामान्य लोकांसोबतच खास लोकही त्यावर विश्वास ठेवतात.




