पुणे : पुण्यात मद्यधुंद अवस्थेत बस चालवत पीएमपीएल बस चालकाने १५ गाडयांना धडक दिली आहे त्यामुळे पुणेकरांसाठी हि धक्कादायक घटना मानली जात आहे रविवारी (२२ ऑक्टोबर ) सकाळी सेनापती बापट रोडवर असलेल्या वेताळ बाबा चौकात हि घटना घडली असून या दरम्यान काही प्रवासी आणि वाहन चालकांना दुखापत झाली आहे
या बस चालकाचे नाव निलेश सावंत असल्याची माहिती समोर आली असून त्याच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. हि बस कोथरूड डेपोची असून भाडेतत्त्वावरील बस क्रमांक ११३३ मार्ग क्रमांक २७६/१३ चालक क्रमांक ६४० निलेश ज्ञानेश्वर सावंत यांनी बस एनडीए गेट ते चिंचवड या मार्गाने जात असताना रत्ना हॉस्पिटल येथे वेडी वाकडी बस चालवली.
ही बस कारला धडक देऊन गेली आणि त्यानंतर पुढील चौकात जाऊन कार आणि बस चालक यांच्यामध्ये वाद पाहायला मिळाला, या कारणावरून बस चालकाने राग मनात धरून भर चौकात कोणताही विचार न करता बस रिव्हर्स घेऊन वाहने उडवली. नंतर बस पुढं घेऊन गेला. हे पाहून बस मधील प्रवासी घाबरून गेले. घाबरलेल्या प्रवाशांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. चतुःशृंगी पोलिसांनी बससह चालकाला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ताबडतोब कामावरून कमी केल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली आहे.



