शाहूनगर (वार्ताहर) मंगलमय स्वरांत महिलांनी पारंपरिक वेशात श्रीसूक्त पठण केले. श्री महालक्ष्मी देवीची आराधना करण्यासाठी सामुदायिक श्रीसूक्त पठणाचे आयोजन शाहूनगर, चिंचवड येथील श्री महालक्ष्मी मंदिरासमोर करण्यात आले होते. सुमारे ३५० भाविकांनी सहभाग घेतला होता.

श्री महालक्ष्मी मंदिर शाहूनगर, धर्मवीर संभाजीराजे मंच व संस्कती. छत्रपती संभाजी राजे मंचाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, संस्थापक संजय पाटील, सांस्कृतिक संवर्धन विकास महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. अजित जगताप, सचिव शिवानंद चौगुले, अर्चना सोनार, हर्षल मुळुक, अर्चना सोनार, दिनेश म्हाबदी, यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते. ‘संस्कृती संवर्धन महिला वजन महासंघ, चिखली याचे उपक्रमाला सहकार्य लाभले.
शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेला हा आदिशक्तीचा शारदीय नवरात्रोत्सव सुरु आहे. ‘संस्कृती संवर्धन महिला भजन महासंघ, चिखली विभागा’चे या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे. रविवारी सकाळी ०६:३० वाजता श्री महालक्ष्मी मंदिरासमोर प्रसन्न वातावरणात महिला श्रीसूक्त सामुदायिकरीत्या पठण करण्याकरता एकत्र आल्या. त्यानंतर ध्यानधारणेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
श्री महालक्ष्मी प्रतिमा पूजन, ॐकार आणि शंखनाद करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक श्रीसूक्त पठणाला सुरुवात झाली. शंखनाद, मंत्रोच्चार आणि श्री सूक्तपठणातून चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. तर, फलश्रुती आणि आरती व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.




