पिंपरी ( प्रतिनिधी) विजयादशमी निमित्ताने शत्रुघ्न काटे यूथ फाउंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर येथे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यंदा १२० फूट उंचीच्या रावणाचा प्रतिकात्मक पुतळा उभारण्यात येणार आहे.
रावणाच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सोमवारी दुपारपर्यंत पुतळा उभारण्यात येणार आहे. बांबू, काठ्या, सुतळी, पुठ्ठे, काथ्या, दोरी आदी साहित्यांचा वापर करून रावणाची प्रतिकृती तयार केली जात असल्याचे आयोजकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले..
रावण दहन दिवशी उपस्थित नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. हरियाणातून सुनील तिलकधारी हिसार हे या उत्सवाचा भाग होण्यासाठी प्रवास करून येणार आहेत. टाइमपास ३ फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे, तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया देवधर आणि प्रसिद्धी दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे या प्रमुख पाहुण्यांचा समावेश असणार आहे.
रावण वध म्हणजे सत्याचा असत्यावर विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतीक मानले जाते. त्यामधून सत्य, ज्ञान, निर्भयता आणि सुखाच्या जीवनावर विजय मिळवायला हवा. यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जात असल्याची माहिती माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली.




