पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ अंतर्गत सुरु केलेले स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षण विभागाच्या वतीने राज्यस्तरीय पुरुष व महिला आणि आंतरशालेय भजन स्पर्धा दिनांक २८ ते ३० ऑक्टोबर, २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर आंतरशालेय भजन स्पर्धेसाठी (१५ वर्षाखालील) संपर्क क्रमांक : ९०२२८१६०५८ द्वारे नाव नोंदणी करणे अनिवार्य राहील. तसेच राज्यस्तरीय भजन स्पर्धेसाठी (महिला गटासाठी : ९६०४६१३४०२, पुरुष गटासाठी : ९६८९९१८९८९ द्वारे नाव नोंदणी करणे दिनांक २५ ऑक्टोंबर, २०२३ अखेर करणे अनिवार्य राहील.
आंतरशालेय भजन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र आणि सहभागी संघास सन्मानचिन्ह व त्यामधील प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय महिला भजन स्पर्धा (खुला गट) आणि राज्यस्तरीय पुरुष भजन स्पर्धा (खुला गट) बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल प्रथम क्रमांक १५०००/-, द्वितीय क्रमांक ११०००/-, तृतीय क्रमांक ७०००/-, उत्तेजनार्थ ४०००/-, उत्कृष्ट हार्मोनियम वादन ११००/, उत्कृष्ट तबला वादन ११००/-, उत्कृष्ट पखवाज वादन ११००/-, उत्कृष्ट गायक ११००/-, शिस्तबध्द संघ ११००/-, प्रथम येणाऱ्या ३० संघास प्रवेश दिला जाईल.
सदर स्पर्धेचे स्थळ : जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कुल अॅन्ड जुनिअर कॉलेज, पाटीलनगर, टाळगांव चिखली असे आहे.
२८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उपसभापती विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे या उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे उद्घाटन शेखर सिंह (भा.प्र.से) आयुक्त तथा प्रशासक तथा अध्यक्ष संतपीठ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. अशी माहिती संतपीठाचे संचालक डॉ.स्वाती मुळे व राजूमहाराज ढोरे यांनी दिली.




