मोशी (वार्ताहर) राज्यात मराठा आरक्षणाचा विषय आपला आहे ठिकठिकाणी सामुदायिक व साखळी उपोषण करण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण लागू करावे, या प्रमुख मागणीकरिता मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांनी आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी गावोगाव साखळी उपोषण करण्याचे आवाहन केले. त्यानुसार चऱ्होली बुद्रुक आणि बाजूच्या १२ वाड्या वस्त्या येथील मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू केले आहे. रविवारी (दि. २९) हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या उपोषणात रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी आठ दरम्यान साखळी उपोषण करण्यात येत आहे. यामध्ये सागर तापकीर, कुणाल तापकीर, पंडितराव तापकीर, अंकुश तापकीर, शिवाजी जगताप, गणेश टाफरे, रमेश तापकीर, ओंकार गिलबिले, विकास तापकीर, सुनील काटे, सुनिल पठारे, प्रदीप तापकीर, महेंद्र पिंजन, आनंदा तापकीर, हरिभाऊ तापकीर, सचिन तापकीर, ज्ञानेश्वर तापकीर, मयुर तापकीर, रामदास गिलबिले यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.




