भोसरी : भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी भाजप प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य पदी कविता हिंगे यांची निवड करण्यात आली. राज्य पातळीवर पक्ष संघटनेत काम करण्याची संधी दिल्याबद्दल ताईंचे कविता हिंगे यांनी आभार व्यक्त करते.
फायरब्रँड चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली समाजकारणाची वाटचाल करताना वेगवेगळ्या पदावर काम करत राजकारण आणि समाजकारणाचा समतोल राखून निष्ठेने आणि नेटाने काम करण्याचा प्रयत्न राहणार आहे. मंडल अध्यक्ष ते जिल्हा सदस्य पर्यंतच्या प्रवासाची शिदोरी सोबत घेतल्यानंतर आज हिंगे यांची प्रदेशावर काम करण्याची संधी देण्यात आली. मेहनतीने लोकसंपर्क वाढवून पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न करणार आहे. अशी प्रतिक्रिया कविता हिंगे यांनी यावेळी व्यक्त केली.




