पिंपरी, दि. ०१ नोव्हेंबर :- पिंपरी चिंचवड ॲडव्होक्टस् बार असोशिएशनची निवडणुक (दि. ३१) रोजी पिंपरीतील नेहरूनगर न्यायालयात पार पडली. या निवडणुकीत नवनिर्वाचीत कमिटीमध्ये सहा सदस्य व सहसचिव बिनविरोध निवडून आले. उर्वरित पदांसाठी अत्यंत चुरशीची लढत पहावयास मिळाली.
या निवडणुकीचे कामकाज निवडणुक अधिकारी बारचे माजी अध्यक्ष ॲड. संजय दातीर पाटिल, ॲड. सुभाष चिंचवडे, ॲड. विलास कुटे, ॲड.अनिलकुमार तेजवानी, ॲड. सुहास पडवळ, ॲड, देवराम ढाळे, ॲड उत्तम चिखले, ॲड. सुशील मंचरकर, ॲड विजय शिंदे यांनी पाहिले.
यावेळी अध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. त्यात विजयी उमेदवार ॲड.रामराजे भोसले यांना ४६८ मते तर ॲड.पांडुरंग शिंनगारे यांना २४० मते मिळाली. उपाध्यक्ष पदाकरिता यावेळी दोन महिला वकिल रिंगणात होत्या. त्यामध्ये विजली उमेदवार ॲड. प्रतिक्षा खिलारी यांना ३९८ तर ॲड. कांता गोर्डे यांना ३०२ मते मिळाली. सचिव पदाकरितासुध्दा दोन उमेदवारांमध्ये लढत होती. यामध्ये विजयी उमेदवार ॲड. धनंजय कोकणे यांना ४४८ तर ॲड. सागर अडागळे यांना २६४ मते मिळाली.
महिला सचिव पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होत्या. यामध्ये दोन मतांनी ॲड. मोनिका सचवानी विजयी घोषित करण्यात आल्या. यावर ॲड. संगिता कुशाळकर यांनी फेर मतमोजणी साठी अर्ज केला. त्यामुळे त्यांचा निकाल राखीव आहे.
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनची नवनिर्वाचित कार्यकारिणी खालीलप्रमाणे :-
ॲड. रामराजे गोरक्ष भोसले – अध्यक्ष
ॲड. प्रतिक्षा सुरेश खिलारी – उपाध्यक्ष
ॲड. धनंजय मगन कोकणे – सचिव
ॲड. – महिला सचिव
ॲड. उमेश राम खंदारे – सह-सचिव
ॲड. अजित प्रदीप खराडे – खजिनदार
ॲड. संदीप भाऊसाहेब तापकीर – हिशोब तपासणीस
ॲड.दशरथ विकास बावकर – सदस्य
ॲड. दर्षले राजू मीनल – सदस्य
ॲड.स्वाती दादा गायकवाड – सदस्य
ॲड.अस्मिता रघुनाथ पिंगळे – सदस्य
ॲड. अय्याज बाबा शेख – सदस्य
ॲड.फारुख अन्वरअली शेख – सदस्य




