पिंपरी : निगडी येथील लोकमान्य टिळक चौकाजवळील भुयारी मार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. या मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून हा मार्ग 1 नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील हनुमान मंदिराजवळील रस्त्यालगत बसथांबा, बँक, विविध दुकाने असल्याने येथे रहदारी असते. दरम्यान, नागरिकांना सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडता यावा, यासाठी येथे भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले. हा मार्ग तयार झाल्यास नागरिकांसाठी सोयीचे ठरणार आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू असून अनेक दिवस उलटूनही अद्याप काम पूर्ण झालेले नाही. तरी हे काम लवकरात लवकर पूर्ण करून हा मार्ग नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.




