पुणे : पुण्यातील ओला, उबर टॅक्सींचे दर आता पुण्याचे आरटीए (प्रादेशिक परिवहन प्राधिकरण) ठरविणार आहे. त्यासाठी मुंबईच्या धर्तीवर एसी टॅक्सीच्या दराचा आधार घेतला जाईल. पुणे आरटीओ प्रशासन याचा अभ्यास करून ‘आरटीए’कडे अहवाल सादर करेल. अध्यक्षांनी
मंजुरी दिल्यानंतर दर ठरविले जातील. संबंधित कंपन्या कमी दर देत असल्याची तक्रार पुण्यातील ओला, उबर चालकांनी इंडियन गिग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांच्याकडे केली होती. त्यानंतर पुण्यात गिग वर्कर्सचा एक दिवसीय संपही झाला. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.
या वेळी निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) संजीव भोर, सहायक कामगार आयुक्त दत्ता पवार, डॉ. क्षीरसागर, कामगार संघटनांचे प्रतिनिधी वर्षा शिंदे, माऊली नलावडे, विनोद घुगे, अजय मुंढे, फय्याज मोमीन आदी उपस्थित होते.
मुंबईत तेथील टॅक्सीचे दर ‘आरटीए’ने एसी निश्चित केले आहेत. त्या दराच्या आधारावर ओला, उबर कंपन्या त्यांचे दर ठरवितात. आता पुण्यात ‘आरटीए’ने ठरविलेले दर पाळणे या कंपन्यांना बंधनकारक असेल.
यावर सुद्धा चर्चा होणार…..
■ एव्हरेस्ट फ्लीट, त्यांच्यासारखे इतर खासगी व्हेंडर आणि सामान्य कॅब, रिक्षाचालकांच्या दरात भेदभाव होत असेल तर आरटीओ माहिती घेईल, गरज वाटल्यास कारवाई करण्यात येईल.
■ पांढऱ्या नंबर प्लेटच्या खासगी गाड्या सर्व अॅप्सकडून दोन आठवड्यांच्या मुदतीत बंद करण्याचा आदेश
■ कंपन्यांनी प्रवाशांच्या तक्रारीवरून चालकांना परस्पर ‘ब्लॅक लिस्ट’ करू नये, शहानिशा करूनच कारवाई करावी
■ वेटिंग चार्जेस




