चिखली : पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस आल्याने ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यातच सकल भागात असणाऱ्या घरकुल वसाहतीमध्ये गुडघाभर पाणी साचून स्विमिंग पूल सारखे वातावरण तयार झाले होते.

शाहूनगर, संभाजीनगर, सानेचौक, शरदनगर, नेवाळे वस्ती, कुदळवाडी, चिखली आदी परिसरातील सखल भागात पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले होते. रस्त्यावरून मोठमोठ्या पाण्याचे लोट वहात असल्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला, त्यामुळे वाहतूक मंदावली होती. तसेच ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी साहित्य विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांची मात्र मोठी तारांबळ उडाली. रस्त्याच्या फुटपात वर अनेक ठिकाणी छोट्या व्यवसाय करणे दिवाळीचे साहित्य विक्री करण्यासाठी ठेवले होते. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे व्यवसायिकाचे मोठी तारांबळ उडाली.
पावसाळ्यात घरकुल वासियांच्या पाणी साचण्याचे प्रमाण पाचवीला पुजलेले असते. पावसाळ्यात ही घरकुल परिसरात नाले तुंबणे प्रकार वारंवार घडत असतात. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घरकुल मधील नाले सफाई केली असे सांगत असताना आज पडलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांचे पितळ उघडे पडले आहे.




