पिंपरी : ट्रेलर चोरी करत असल्याच्या संशयावरून इसमास ट्रेलरमध्ये घालून बेदम मारहाण करून त्याला जीवे मारून महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीच्या गेटजवळील मोकळ्या जागेत टाकून देणाऱ्या तीन आरोपींना गुंडा विरोधी पथकाच्या टीमने २४ तासांच्या आत गजाआड केले.
यामध्ये १) दशरत उर्फ सोनू जयराम आडसूळ, २१ वर्ष रा कामठा ता. तुळजापूर जिल्हा धाराशिव, २) विष्णू अंगद राऊत, २९ वर्ष, नालवंडी, जिल्हा बीड आणि ३) बळीराम वंसत जमदाडे, ३५ वर्ष, कामठा, ता. तुळजापूर जिल्हा धाराशिव यांना अटक करून पुढील कारवाईसाठी म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दशरत उर्फ सोनू जयराम आडसूळ, विष्णू अंगद राऊत आणि बळीराम वंसत जमदाडे हे ट्रेलर पार्किंग करून जेवण करायला गेले असताना मयत अमोल विकास पवार हा ट्रेलर चोरी करत असताना पकडला गेला. याच रागातून या आरोपींनी त्याला त्याच ट्रेलरमध्ये घालून बेदम मारहाण करून जीवे मारला व महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीच्या गेटजवळील मोकळ्या जागेत फेकून दिला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुंडा विरोधी पथकाने तपासाची सूत्रे हालवत रायगड आणि पालघर येथून आरोपींना पडून म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात दिले.
हि कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतिश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) बाळासाहेब कोपर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रविण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, विजय गंभिरे, सुनिल चौधरी, नितीन गेंगजे, शाम बाबा, रामदास मोहीते, शुभम कदम, तौसीफ शेख, टी.ए.डब्लयूचे नागेश माळी यांनी केली आहे.




