- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
पिंपरी (प्रतिनिधी, ७ जानेवारी २०२४ – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पिंपरी चिंचवड शहर स्वयंरोजगार व महिला बचत गट महासंघ सेलच्या शहराध्यक्षपदी ज्योती गोफणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गोफणे यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. मोशी येथील कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे यांच्यासह पक्षाचे माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियुक्तीनंतर बोलताना ज्योती गोफणे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री आणि आमचे मार्गदर्शक अजितदादा आणि महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर तसेच आमचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पक्षाची जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती जबाबदारी सक्षमपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. या पदाच्या माध्यमातून मी शहरातील महिला बचत गटांना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळवून देता येईल आणि त्याचबरोबर महिलांना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे, गोफणे यांनी सांगितले.




