पिंपरी : ऐन हिवाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना नेमका कोणता ऋतू सुरू, आहे हेच समजेनासे झाले आहे. जानेवारी हा थंडीचा महिना पण ‘पावसाळा नाही आणि हिवाळा पण नाही.. पिंपरी चिंचवडकर यांनी अनुभवला हिवसाळा…’ या प्रकारचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पिंपरी चिंचवड शहर व उपनगरात आज सकाळपासूनच दाट आभाळ भरून आले होते. पावसाळा असला तर नागरिक कामाव्यतिरिक्त बाहेर पडत नाहीत. मात्र आज झालेल्या अवेळी पावसामुळे चाकरमान्यांची व लहान शाळेत जाणाऱ्या मुलांची मोठी तारांबळ उडाली. दिवाळीत व नंतर साधारणपणे थंडी असते. यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण तुलनेत कमी झाले आहे.
पण हवामानात एवढे बदल झाले आहेत वर्षातील कोणत्या महिन्यात आणि केव्हाही पाऊस पडेल हे सांगता येत नाही. केव्हाही पाऊस पडू शकतो या मानसिकतेतून नागरिक त्या तयारीनीशी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे किमान दुचाकीवरून जाणाऱ्या सर्व वाहन चालकाने पावसापासून बचावासाठी छत्री किंवा रेनकोट सोबत घेऊन जावे. कारण उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या व्यतिरिक्तही वर्षात कोणतेही ऋतूत पाऊस पडू शकतो याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे.




