पिंपरी : अयोध्येत (उत्तर प्रदेश) नव्याने बांधल्या जात असलेल्या मंदिरात उद्या २२ जानेवारी (सोमवारी) रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याचे औचित साधत चिंचवड येथील सूर्या इलेक्ट्रॉनिक्स समूहाने आपल्या शिरूर जिल्हा पुणे येथील दुसरे भव्य नव्या इलेक्ट्रॉनिक्स दालनाचे उद्घाटन आयोजित केले आहे. अशी माहिती सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचे डायरेक्टर रमेश चौधरी यांनी दिली आहे.
या निमित्ताने सोहळ्यासाठी सूर्या सहपरिवार आणि ग्राहकांना आमंत्रित केले आहे. उद्घाटन सकाळी 10:00 वाजता ते आपल्या आगमनापर्यंत वेळ असणार आहे. स्थळ- गंगा हायवे सेंटर मॉल, शिरूर -अहमदनगर हायवे याठिकाणी आहे.
रमेश चौधरी यांनी एक हेल्पर ते उद्योजक असा खडतर प्रवास करत सुर्या इलेक्ट्रॉनिक नावाने पुणे जिल्ह्यात ११ दालने जनतेच्या सेवेत कार्यरत आहे. श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दिवसाचे औचित्य साधत १२ वे दालन लोकांच्या सेवेत सुरू होत आहे. सूर्या इलेक्ट्रॉनिक्स परिवाराने २०० कामगारांच्या हाताला काम दिले आहे. सूर्या इलेक्ट्रॉनिक्समधील व्यवस्थापन निष्ठेने ग्राहकसेवा, ऑनलाईनपेक्षा स्वस्त उपकरणे उपलब्ध करून देते. पारदर्शक व्यवहार, हे आमचे वैशिष्ट्य आहे. यामुळे सुर्या इलेक्ट्रॉनिक्स जनतेच्या प्रेमातून घडलेला ब्रॅंड बनला आहे.




