पिंपरी ; निगडी गावात श्री. खंडोबा उत्सवानिमित्त स्थानिक राजकीय नेत्यांनी उत्सवाला येणाऱ्या नागरिकांच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनरबाजी केली आहे. मात्र या फ्लेक्सवरती लिहिलेल्या अनेक राजकीय टोलेबाजीतून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये निगडी गावठाणातील शेर कोण आणि सव्वाशेर कोण याची चर्चा परिसरात होत आहे.
निगडी मधील स्थानिक रहिवासी असलेले पवळे कुटुंबातील ज्येष्ठ नेते दत्ता पवळे यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या फ्लेक्सवरती “शेर के खामोश हो जाने से, जंगल पर कभी कुत्तो का राज नही होता…!” या वाक्याने नागरिकांचे लक्ष वेधले आहे. तर सचिन चिखले यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या फ्लेक्सवरती निगडीचे शिल्पकार “जंगल वही रहेगा लेकिन, इस बार शेर बदलेगा..” या टॅगलाईनमुळे दोन राजकीय कुटुंबातील सुप्त संघर्षाची चाहूल प्रकर्षाने दिसून येत आहे.
दिवंगत महापौर मधुकर पवळे यांच्या कुटुंबाचा राजकीय वारसा फार मोठा आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पवळे कुटुंबातील मागील अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करत आहे. तर मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी २०१२ मध्ये महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच आपल्या पत्नीसह दोन लोकप्रतिनिधी निवडून आणत “राजा का बेटा ही राजा नहीं होगा” दाखवत एंट्री केली. त्याच्या कुटुंबातील मागील दहा वर्षापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रतिनिधीत्व करत आहे. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत पवळे व चिखले या दोन कुटुंबामध्ये राजकीय संघर्ष पुन्हा पाहायला मिळणार का? अशी चर्चा निगडी गावठाण परिसरात सुरू झाली आहे.




