पिंपरी : पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल स्कूल अँड जुनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. नर्सरी ते नववी पर्यंतचे विद्यार्थ, शिक्षक व पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद दर्शविला. यामध्ये भारतातील विविध राज्यांच्या संस्कृती व त्यांचे विविध नृत्य प्रकार यांचे प्रदर्शन करण्यात आले .

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, भावनिक, धार्मिक , बांधिलकी असणाऱ्या मराठी , हिंदी व इंग्रजी गाण्यांवर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान करून नृत्य सादर करत मनसोक्त आनंद लुटला. शाळेचे संस्थापक प्रो. डॉ. जगन्नाथ काटे , प्राचार्या डॉ. धनश्री सोनवणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजन केले.
यावेळी प्रमुख अतिथी आमदार मा .अश्विनीताई जगताप, माजी नगरसेविका निर्मलाताई कुटे , उन्नती फौंडेशन अध्यक्षा कुंदाताई भिसे , सहाय्य्क प्रकल्प अधिकारी विलास पाटील, उन्नती फौंडेशन संस्थापक संजय भिसे, पी. के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे चेअरमन व पी.के. स्कूलचे खजिनदार सोमनाथ काटे,शाळेचे प्रतिष्ठान सदस्य नंदाताई कस्पटे , गणेश कलापुरे , बद्रीनाथ पानमंद , केदारनाथ पानमंद ,वैशाली काटे, संगीता काटे , राष्ट्रवादी साहित्य कला आणि सांस्कृतीक विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रीमा रंजन, पी.के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे मॅनेजर ऑफ डायरेक्टर रोहन काटे , प्रथमेश काटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वणी टाकळकर व शुभांगी कडुसकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुष्मा निखाडे यांनी केले . तसेच या कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्राचार्या प्रो. डॉ. धनश्री सोनवणे ,स्वाती कोथुळे , क्रीडाशिक्षक राहुल कोरे , अभिजीत तांबडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम ने झाली .




