प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या प्रमाणात दादरच्या शिवाजी पार्क येथे जमतात. यावेळी कुठलाही घातपात, किंवा अन्य घटना होऊ नयेत यासाठी मुंबई पोलिसांकडून कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
शहरात पाच किंवा त्याहून अधिक लोकांच्या एकत्र येण्यास आणि मिरवणुका काढण्यास ६ फेब्रुवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान मनोज जरांगे यांच्यासह हजारो मराठा कार्यकर्त्यांनी 26 जानेवारीपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्याची घोषणा केली असून मुंबईच्या दिशेन येतायेत आहेत.
जरांगे यांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे गजबजलेल्या मुंबईत मराठा समाजाच्या आंदोलनामुळे शांतता भंग होऊ शकते मालमत्तेची हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी आंदोलन मोर्चे काढण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश बुधवारपासून लागू झाला असून पुढील 15 दिवस लागू राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.




