पिंपरी: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिल्याने शरद पवार गटाच्या शहराध्यक्षसह कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी आंदोलन केली तर राज्यात अनेक कार्यालयातील बोर्ड व घड्याळ चिन्ह खाली उतरवले तर यावलट पिंपरी चिंचवड शहरातील शरद पवार गटाच्या कार्यालयासमोर असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे चिन्ह अडणारा कार्यालयाचा बोर्ड अजूनही जैसे तेथेच परिस्थितीत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शरद पवार गटाने निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी करत मुंडन आंदोलन केले. आमचा पक्ष आमचं चिन्ह शरद गोविंदराव पवार अशा आशयाचे फलक लावले. राज्यातील पक्षाच्या कार्यालयात असणारे घड्याळाचे चिन्ह हटवण्यात आले तर कार्यालयांवरती असणारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव ही शरद पवार गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांकडून काढण्यात आले पिंपरी चिंचवड शहरात आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दौऱ्यावरती असतानाही शरद पवार गटाच्या पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य कार्यालयासमोरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बोर्ड व घड्याळाचे अधिकृत चिन्ह दोन्हीही काढण्यात आलेले नव्हते. त्यामुळे नागरिकांच्या नजरा येताना जाताना त्यावरती लक्ष केंद्रित करत होत्या.

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहानंतर विधानपरिषद, विधानसभा, राज्यसभा व लोकसभा यामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व सदस्यांचा अजित पवार आणि शरद पवार अशा दोन गटात विभाजन झाले. अजित पवार यांच्यासोबत एक गट राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यानंतर पक्ष कोणाचा याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. काल केंद्रीय निवडणूक आयोगाने सदस्यांच्या संख्येवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडे देण्याचे स्पष्ट केले. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात ही शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाविरुद्ध निदर्शने केली. राज्यात अनेक ठिकाणी पक्षाचे नाव व अधिकृत चिन्ह काढून टाकले असे असताना मात्र, पिंपरी चिंचवड शहरातील मध्यवर्ती कार्यालय असणाऱ्या पिंपरी चौकातील शरद पवार गटाच्या कार्यालया समोरील बोर्ड व पक्षाचे चिन्ह अद्याप तसेच आहे.




