चांदखेड – महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत मावळ तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल , चांदखेड शाळेचा एलिमेंटरी चा निकाल 89.91% व इंटरमिजिएट चा निकाल 94.79% लागला आहे.न्यू इंग्लिश स्कूल चांदखेड या शाळेतून एलिमेंट्री परीक्षेसाठी 109 विद्यार्थी व इंटरमिजिएट परीक्षेसाठी 96 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
एलिमेंट्री परीक्षेत विद्यालयातील A ग्रेड मध्ये 2 विद्यार्थी, B ग्रेडमध्ये 04 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून इंटरमिजिएट परीक्षेत A ग्रेड मध्ये 2 विद्यार्थी, B ग्रेडमध्ये 08 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या एस एस सी परीक्षेत कला विषयाच्या मिळणाऱ्या वाढीव गुणांमुळे या परीक्षांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एस.एस.सी. परीक्षेत मिळणाऱ्या गुणात वाढ होते.
या परीक्षेसाठी विद्यालयातील कलाशिक्षिका सौ. खाडे पी. व्ही. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . विद्यालयाचे मुख्याध्यापक आजिनाथ ओगले यांनी यशस्वी विद्यार्थी व कला अध्यापिकेचे अभिनंदन केले.




